नुकतेच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेच्या (Indian Institutes of Handloom Technology - IIHT) च्या 'IIHT SUTRA - २०२६' या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्यामार्फत नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये (Dr Ambedkar International Centre - DAIC) येथे 'IIHT SUTRA २०२६' या 'भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेच्या (IIHTs)' पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- सदर परिषदेचे आयोजन वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात आले होते.
- 'IIHTs: भारतीय हातमाग क्षेत्राचे भविष्य विणणे – शिक्षण आणि नवोपक्रम (Weaving the Future of the Indian Handloom Sector – Educate. Innovate)' ही या परिषदेची संकल्पना होती.
- या कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीसाठी IIHT च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.